इ. ८ वील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जाणाऱ्या NMMS या शासकीय परीक्षेमधून जे विद्यार्थी निवडले जातात, त्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी इ. १२ वी पर्यंत शासनामार्फत शिष्यवृत्ती दिली जाते. या परीक्षेत जे दोन विषय असतात, त्यापैकी एक म्हणजे शालेय क्षमता चाचणी (Scholastic Aptitude Test - SAT).
SAT मध्ये समाविष्ट असलेले विषय
विज्ञान
३५ (भौतिकशास्त्र - ११, रसायनशास्त्र - ११, जीवशास्त्र - १३)
समाजशास्त्र
३५ (इतिहास - १५, नागरिकशास्त्र - ५, भूगोल - १५)
परीक्षेचे स्वरूप आणि तयारी
- ही परीक्षा दरवर्षी डिसेंबर महिन्यात घेतली जाते. इ. ७ वी व ८ वी चा अभ्यास यासाठी अपेक्षित आहे. सर्व प्रश्न बहुपर्यायी असणार आहेत, ज्यामध्ये प्रत्येक प्रश्नाला चार पर्यायी उत्तरे दिलेली असतील. विद्यार्थ्याने त्या पैकी सर्वात बरोबर पर्याय निवडायचा असतो.
- या विषयाची तयारी करताना विद्यार्थ्यांनी केवळ घोकंपट्टी करता कामा नये. प्रत्येक शब्द आणि प्रत्येक वाक्य नीट समजून घेतले पाहिजे. मूलभूत संकल्पना स्पष्टपणे मनात रुजल्या पाहिजेत. आवश्यक सूत्रे, व्याख्या, घटनाक्रम यांचे स्मरण ठेवले पाहिजे.
शालेय क्षमता चाचणी (SAT) प्रश्न प्रकार
- सर्व प्रश्न बहुपर्यायी असतील, प्रत्येक प्रश्नाला चार पर्यायी उत्तरे असतील.
- प्रत्येक प्रश्नाला योग्य उत्तर निवडायचे असते.
याशिवाय, यातील अनेक प्रश्नांची उत्तरे थेट क्रमिक पुस्तकात सापडणार नाहीत. विद्यार्थ्यांना स्वतः विचार करून उत्तराकडे जाता येईल. काही प्रश्नांमध्ये उपयोजन, सृजनशीलता, भाकित करणे या उच्च दर्जाच्या बौद्धिक क्षमतांचा वापर करावा लागतो.
परीक्षेची तयारी आणि समज
विद्यार्थ्यांना अशा वेगवेगळ्या क्षमतांची चाचणी घेणारे प्रश्न कसे विचारले जातात आणि त्यांची उत्तरे कशा प्रकारे शोधायची याचे विवेचन या पुस्तकात केलेले आहे. प्रत्येक विषयातील प्रश्न हे त्या विषयातील श्रेष्ठ आणि ज्येष्ठ विषय तज्ञांकडून तयार करून घेतले आहेत.
Click to here for order the book